माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,
'आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,प्रत्येक टप्प्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरुंना शतशः वंदन! गुरु पौर्णिमा म्हणजे ज्ञानाची पुजा नाही तर या दिवशी गुरूंच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करून ज्ञानाची पूजा केली जाते.
शिष्य आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन समर्पित करण्याची प्रतिज्ञा करतात.गुरुपौर्णिमा,ज्याला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात,महर्षी व्यास यांच्या जन्मदिवशी साजरी केली जाते,ज्यांनी वेदांचे विभाजन केले आणि 18 पुराणे लिहिली. पण गुरूपौर्णिमा म्हणजे फक्त वेद व्यासांची जयंती एवढंच नाही तर त्याबरोबर आणखी एक आख्यायिक आहे.
"की गुरूपौर्णिमेच्या दिवशी सप्तर्षीना (सात ऋषींना) भगवान शंकराने त्यांना योगाचे ज्ञान दिले होते.त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित असतो, गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव आहे.गुरु हा केवळ शिक्षक नाही, तर जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक असतो.
त्यामुळे हा दिवस गुरुजींचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे.
हा दिवस गुरुजनांच्या प्रती आदर आणि सन्मान व्यक्त करण्याचा आहे. गुरुपौर्णिमा हा एक महत्वाचा भारतीय सण आहे, जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी, विद्यार्थी आपल्या गुरुजनांविषयी (शिक्षक) मार्गदर्शक व कृतज्ञता व्यक्त करतात.
गुरुपौर्णिमा आध्यात्मिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा दिवस आहे.या दिवशी, लोक त्यांच्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना आदराने अभिवादन करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, विद्यार्थी आपल्या गुरूंना फुले किंवा मिठाई आणि भेटवस्तू अर्पण करून त्यांचा आदर करतात.
'तसेच गुरुजनांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा हा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या पूजेसाठी हा श्लोक बोलला जातो.
'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः,गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म,तस्मै श्रीगुरवे नमः।।
"या पारंपरिक श्लोकाचा उच्चार केला जातो. या श्लोक चा अर्थ असा होतो की गुरू हा ब्रह्मासमान आहे, जो सृष्टीची रचना करतो. आणि गुरू विष्णु हे समान आहे, जो सृष्टीचे पालन करतो. आणि गुरू शंकरासमान आहे, जो सृष्टीचे संहार करतो. गुरू हे स्वतः परम सत्य आहे, त्या गुरूंना माझा नमस्कार." आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाने चाललेल्या जगात, शिक्षक आणि मार्गदर्शकांची भूमिका नेहमीसारखीच महत्त्वाची आहे. शिक्षक केवळ शैक्षणिक ज्ञानच देत नाहीत तर विद्यार्थ्यांचे चारित्र्य आणि मूल्ये घडवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनातील शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची कबुली आणि कौतुक करण्याची आठवण आहे. तणाव आणि भौतिकवादाने चिन्हांकित केलेल्या युगात, आंतरिक शांती आणि संतुलन राखण्यासाठी आध्यात्मिक शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. अध्यात्मिक गुरू अंतर्दृष्टी आणि सराव प्रदान करतात जे व्यक्तींना जीवनातील आव्हाने शहाणपणाने आणि समंजसपणाने हाताळण्यास मदत करतात.
'गुरुपौर्णिमा अशा मार्गदर्शनाची मागणी आणि सन्मान करण्याच्या महत्त्वावर भर आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो. अशा गुरुंना मान देणे,आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आदय कर्तव्य आहे. भारतीय परंपरेत गुरुशिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत.
शुक्राचार्य जनकू, विश्वमित्र - राम र लक्ष्मण, प लक्ष्मण, परशुराम - कर्ण व द्रोणाचार्य - अर्जुन, अशी गुरुशिष्य परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडिलबंधू निवृत्तीनाथ यांनाच शुरु मानले. या गुरु-शिष्यांचा इतिहास पाटिल्यास आपल्याला प्रेम, निष्ठा आणि शुरुरुंच्या प्रति कृतज्ञता यांची
खरी ओळख पटते. आई-वडिल हे आपले पहिले गुरु असतात. ते लहानपणापासून आपले संगोपन करतात, आपल्यावर चांगले संस्कार करतात. नंतर आपले शुरू हे आपले शिक्षक असतात.लिहायला वाचायला शिकवतात. "दाटतो अंधार जेव्हा,वाट दाखवी गुरु....
श्रेष्ठ कोणी ईश्वराहूनही ते म्हणजे आपले गुरु!
जीवना देई आकार असा थोर शिल्पकार वाट अवघड,होते सोपी जेव्हा गुरु होई आधार,
'भेदभाव नसतो इथे मार्ग सत्याचा खरा सर्वांसाठी समानतेने ज्ञानाचा अखंड वाहे झरा,
आयुष्याला सावरुनी भविष्य,
आपले घडवतात.बळ पंखात आपल्या
भरूनी भरारी घेण्यास शिकवतात,
प्रेमाचा वटवृक्ष होऊनी गुरु देतात.
शीतल सावली म्हणूनच सदा वंदनीय असते,
जीवनात आपल्या गुरुमाऊली!
"आजचा ब्लॉग मी गुरुपौर्णिमेविषयी लिहिला आहे, तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा आणि लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद..........
0 Comments