"उन्हाळ्याची सुट्टी" अजूनही होते... का मामाच्या" गावी....? आणि 'तशी धमाल मस्ती'

      "उन्हाळ्याच्या सुट्ट्या" म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे आपल्या आपल्या मामाचं गाव. आपल्याला लगेच कविता आठवते. 
"झुकु झुकु झुकु झुकु" अगीन गाडी.... 
धुरांच्या रेशा हवेत काढी.....,
पळती झाडे पाहूया.......
मामाच्या गावाला जावूया......
       अगदी हेच दृश्य आपल्या डोळ्यांसमोर जीवंत होतं.लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची धम्माल असायची. "सुट्ट्या लागल्या  की मामाकडे कधी जातो असं व्हायचं.  आज्जी आजोबांचे भरपूर लाड, आजीने केलेला भरपूर खाऊ, भावंडांसोबतची एकत्र धम्माल, मस्ती एकत्र आमरस खाणे'  मनसोक्त चिंचा आणि कैऱ्या पाडणे, आंबे खाणे, गावभर फिरायला जाणे, शेतावरची मज्जा आणि पहाटे उठून नदीवरून पिण्याची पाणी आणणे.
  आमच्या वेळी  'उन्हाळ्याच्या सुट्टीत ( summer camp) वगैरे हा प्रकार नसायचा.  
त्यामुळे बायकांना पण मुलांच्या निमित्ताने का होईना, महीनाभर माहेरी रहायला मिळायचे. रात्री गच्ची वर चांदण्या मोजत, गार हवेत झोपण्याची मजा कुणी कुणी अनुभवली आहे....?  चोर पोलीस, त्यानंतर लपंडाव, धप्पा  कुट्टी, ग****, शिवना पाणी, बर्फ का पानी आशे बरेच खेळ आम्ही खूप खेळलो आहोत. नवीन खेळ शिकायला मिळायचे "उन्हाळ्याच्या सुट्टीत"  
  या मुळे सख्या चुलत, आते मामे भावडांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हायचे.  मात्र मामीच्या  हातच्या लाडवांनी आणि शेतावरच्या गार हवेनीच वर्ष भराच सगळा शीण निघून जायचा. आजोबा पेट्या भरून हापूस आणून ठेवत. असत आणि आजी, मामी, आई या मिळून त्याचा रस करत, मामी माहेरी गेल्यावर तिच्या माहेरी देखील सगळं सारखंच.
त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपलेपणाच्या होत्या, सहवासाच्या होत्या आणि मायेच्या होत्या.
दुपारी आजी  हातात रस्ना, लिंबू सरबत, कोकम सरबत, अशा अनेक प्रकारच्या शीतपेयांचा ग्लास द्यायची आणि भावंड मंडळी भर दुपारच्या उन्हात बाहेर जायचे नाही म्हणून घरीच, नाव,गाव वस्तु,प्राणी,शब्दकोडे,पत्ते असे अनेक खेळ खेळत बसायची. मग संध्याकाळी भरपूर मैदानी खेळ खेळत. सोसायटी मधील सर्वच मुले एकत्र येऊन चोर पोलिस,लगोरी असे किती तरी खेळ खेळायचे.  रात्री ९ वाजता आजी आम्हाला ओढत घरी आणायची, कधी कधी तर रात्रीचे जेवण एखाद्या मित्राकडे किंवा मैत्रीणीकडे असायचे,
  टीव्हीवर लग्नाची कॅसेट लावून सगळे एकत्र बसायचे  लग्नामध्ये कोणी कोणी काय काय केले त्याची सगळ्यांनी टिंगल करायची. आई,बाबा,दादा,ताई, मामा,मावशी काका,आत्या,  आज्जी आजोबा... जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी गप्पा मारायला एकत्र बसायचे. सगळ्यांच्या हातात चिवड्याचे ताट आणि सगळ्यांसाठी लिंबू सरबत.  सर्वांसोबत बसायला खूप मजा यायची. 
"खूप भारी असायच्या त्या मामाच्या घरी घालवलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या"

Post a Comment

0 Comments