"आपल्या दैनंदिन जिवनात ज्या विजेचा संबंध येतो, ज्याच्या शिवाय वेळोवेळी आपण प्रत्येक कामात अडू शकतो,ती वीज आपले पर्यंत पोहोचण्याचे काम कोण करत बर......?
महावितरण चे वायरमन करत असतो.
पण म्हणतात ना विज गेल्याशिवाय विजेचे महत्व कळत नाही,आणि तसेच आपल्या पर्यंत विज पोहचवण्याकरिता अहोरात्र झटणाव्या विज कर्मचाऱ्याचे देखील आपल्याला महत्व कळत नाही आणि तसेच आपल्याला इतर विभागातील कर्मचारी आपल्याला समोरासमोर दिसतात. जसे की,
उदा, एस टी, मध्ये आपण प्रवास करताना आपल्याला एसटी चालक आणि वाहक ते आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. आणि पोस्टाने आलेले पत्र तुम्ही पोस्टमन च्या हाताने घेता,आणि अजून आशे बऱ्याच काही उदाहरणे आपल्याला देता येतील.
पण जी अदृश्य अशी वीज तुमच्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम जो विज कर्मचारी करतो,तो आणि त्याचे काम नेहमी कर्तव्यनिष्ठ असते. आणि तो आपलं काम जीवाची परवा न करता करत असतो. आपण कधी त्या वीज कर्मचाऱ्यांचा विचार केला आहे का हो.....? 'आपली लाईट पाच मिनिटांसाठी जरी गेली तर आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर निघतात.पण आपण हा विचार कधी करतो का हो आपल्याला विज मिळावे म्हणून तो वीज कर्मचारी डीपीवर किंवा खांब्यावर आपल्या जीवाची परवा न करता काम करत असतो,आणि आपण घरात बसून त्या कर्मचाऱ्याला अपशब्द बोलत असतो,
पण आपण कधी लाईट गेली की लगेच आपण एम एस ई बी(MSEB) च्या ऑफिस मध्ये फोन करतो.आपण मात्र थोडा वेळ सुद्धा थांबत नाहीत लगेच महावितरण च्या ऑफिसमध्ये फोन करत राहतो. मात्र तो वीज कर्मचारी आपल्याला वीज मिळावे म्हणून अहो रात्र काम करत असतो,
'तो वीज कर्मचारी आपली लाईट गेल्यावर ती चालू होत नाही. तो पर्यंत आपला जिव धोक्यात घालून तो वीज कर्मचारी काम करत असतो,एका सेकंदासाठी देखील आपण त्या वीज कर्मचाऱ्यांचा विचार करत नाहीत.पण महावितरण मात्र आपल्या ग्राहकांना सुरक्षितता आणि विश्वास देण्याचा प्रयत्न करत असते.
आणि विविध कार्यक्रमांद्वारे समाजात जनजागृती करत असते.वीज वापरताना आपण कोणती काळजी घेणे आवश्यक आहे.यासाठी देखील महावितरण विविध जनजागृती चे कार्यक्रम आयोजित करत असतात.
दिन रात तु मेहनत करता.......!
बिजली तु सब को दिलाता,
खुद की ना तु पर्वा करता........!
वायरमैन तेरी यही कहाणी,
औरो की तु सेवा करता......!
सर्दी गर्मी या बरसे पानी,
तन पर तेरे वर्दी वही पुरानी.......!
वायरमैन तरी यही कहाणी,
हम सभी तुमसे सीखे.........!
मेहनत की परी भाषा,
मेहनत करलो जग में जिंदगी ना व्यर्थ जाएगी तुम्हारी, वायरमैन तेरी यही कहाणी............!
"महावितरणचा वर्धापन दिवस हा एक केवळ उत्सव नाही,तर तो एक वीज वितरण क्षेत्रात सुरक्षा आणि जबाबदारी यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक विशेष दिवस आहे.या दिवसाद्वारे,महावितरण आपले ध्येय आणि महावितरण चे कार्य लोकांपर्यंत पोहोचवते आणि समाजाला सुरक्षित आणि जबाबदार वीज वापरण्यासाठी प्रेरित करत असते.महावितरण वर्धापन दिनानिमित्त त्या वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा आणि कार्याचा गौरव केला जातो.
"आजचा ब्लॉग मी महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त केला आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.
धन्यवाद...........!
0 Comments