पती-पत्नीमधील नाते कसे असावे.......?(What should be the relationship between husband and wife....?)

What should be the relationship between husband and wife



"
नवरा-बायकोचं नातं हे सगळ्यांन नात्यांपेक्षा खूप वेगळे असते.त्यांचं नातं खूप छान असतं.त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास, समर्पण आणि आपुलकी असते. त्यांच्या नात्यात ते एकमेकांचे सुख दु:ख वाटून घेतात. कोणती ही परिस्थिती असो ते एकमेकांना समजून घेतात. 
  'एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेतात.नवरा बायकोच्या नात्यांसारखं कोणतच सुंदर नातं नाही,"आपल्या देशात सर्वात जास्त टिकणारे नाते म्हणजे नवरा बायकोचे आहे. 
 आणि तेच नाते सर्वात जास्त न टिकणारे ही आहे. महत्वाची गोष्ट कोणती आहे. तर ते नातं टिकवून ठेवण्याची. तयारी त्या दोघात पण पाहिजे. 
 सर्वात पहिले दोघांना एकमेकांवर विश्वास असला तर ते नातं कधीच तुटत नाही, नवरा बायकोचं नातं हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असतं. 
 "जर त्यांना एकमेकांवर विश्वास असेल तर ते नातं कधीच तुटत नाही, त्यांना जर त्यांच्या नात्यावर विश्वास नसेल तर ते नातं कधीच टिकत देखील नाही,  
 "नवरा-बायकोचं नातं हे एका सुंदर प्रवासासारखं असतं. या प्रवासात भरपूर चढ उतार येतात, पण त्यातून ते दोघे एकत्र असतील तर त्यातून ते सहज मार्ग काढू शकतात. 
 त्यातून त्यांनी एकत्र प्रवास करणे खूप महत्त्वाचे असते. त्यांच्या नात्यात प्रेम आणि विश्वास असला की कोणतीही अडचण ते सहज पार करू शकतात.पण संकटाच्या काळी सगळ्यांनी साथ सोडली तरी बायको नवऱ्याची साथ कधीच सोडत नाही. 
 त्यामुळे नवरा बायकोचं नातं हे अजूनच घट्ट होतं. लग्नबंधन हे एक खुप पवित्र बंधन आहे. याची जर त्या दोघांना पण जाणीव असेल, तर त्यांचं नातं शेवटपर्यंत तसंच टिकून राहतं. 
मोह नाही तिला पैशाचा......, 
विश्वास हावा आहे, तिला सर्वांचा,
साथ हावी आहे, तिला नवऱ्याची........,   
मान हवा आहे, तिला घरात,
प्रेम हवं आहे,तिला सर्वांचं.........
काळजी करते.ती घरात सर्वांची, 
आई आहे,ती मुलांची......,
आणि सुन आहे, ती त्या घराची,  
कधी साथ नाही सोडणार,ती नवऱ्याची.........., कारण लक्ष्मी आहे, ती त्या घराची.........!  
   'कधी विचार केला आहे का त्यांनी की त्यांचं नातं नक्की काय आहे..........?
  मैत्री आहे, की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, की नवरा बायको आहे.की त्याहून काही अधिक आहे.........? त्याच नातं असं आहे, की त्यांच्या नात्याला कोणतंच नाव नाही, तरी पण त्यांना एकमेकांची सोबत हवी आहे. 
 ही च तर त्यांच्या प्रेमाची खरी व्याख्या आहे. नवरा-बायको ते आयुष्यभर सोबत राहून निस्वार्थ भावनेने फक्त एकमेकांना जीव लावणे, एवढंच त्यांना कळतंय.  
 खरंच नवरा तो नवराच असतो.......,!
नवरा म्हणजे,दुसरं रूप असतं वडिलांचं. 
तो आपल्या परिवाराला तळहाताच्या,
फोडावानी जपत असतो. 
तो उन्हातान्हात कष्ट करू नये, 
आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी तो झटत असतो. 
खरंच नवरा तो नवरा असतो........!
तो मात्र स्वतः उन्हाचे चटके खात असतो, 
आम्हाला सावलीत ठेवत असतो. 
खरंच नवरा तो नवराच असतो......!
चिंता हजारो त्याच्या डोक्यात असतात. 
आमच्यासमोर मात्र चेहरा सदैव हसरा ठेवत असतो. त्याची धडपड मात्र सगळ्यांना सुखी ठेवण्याची असते, दुसरा कोणता विचार न करता. 
त्याला न पेलणार ओझही तो न डगमगता ओढत असतो. 
खरंच नवरा तो नवराच असतो.........!
त्याचा कितीही जीव जरीही थकला असला, 
तरी ही तो कधीच चिडत नाही. 
त्याचं लपलेलं दुःख,कोणालाही कळतं नाही.
आमच्या काळजीपोटी तो आम्हाला रागावून पुन्हा, 
तो मायेने आम्हाला जवळ करत असतो. 
खरंच नवरा तो नवराच असतो.......!
नवरा म्हणजे मजबूत छप्पर असतं घराचं. 
नवरा म्हणजे प्रवेशद्वार असत. 
आपण पाहिलेल्या साऱ्या स्वप्नांचं,
सर्वांच्या आवडी निवडी तो जपता असतो,
स्वतःच मन मात्र तो मारत असतो. 
खरंच नवरा तो नवराच असतो......!
सनासुदीला मात्र आम्हाला सर्वांना,
तो नवीन कपडे आणतो पण स्वतः मात्र 
फाटके कपडे आवडीने घालतो. 
खरंच नवरा तो नवरा असतो.........!
त्याला एखादी गोष्ट आवडत नसली.
तरी तो परिवाराच्या खुशीसाठी करत असतो.
खरंच नवरा तो नवरा असतो........! 

Post a Comment

0 Comments