आता मुलांची नव्याने शाळा चालू होणार आणि आता मुले पुढच्या वर्गामध्ये जाणार,मुलांची आता परत नव्याने शाळा चालू होणार. या गोष्टीची खुशी मुलांना गगनात मावेना अशी होते. आपल्याला शाळेत जायचे आपल्याला आता नवीन मित्र-मैत्रिणी होणार.नवीन सर मॅडम येणार ते कसे असतील मारत नसतील ना खूप राग गेट वगैरे नसतील ना असे विचार मुलांना पडत असतात.
मुलांना आपण शाळेत जाणार.नवीन मित्र-मैत्रिणी करणार या गोष्टीची खुशीत असतेच आणि मी आता खूप अभ्यास करणार आणि चांगले मार्क्स घेणार असे विचार मुलांच्या मनात येत असतात. की शाळा हे केवळ एका इमारतीचे नाव नाही, तर ते एक ज्ञान आणि विचारांचे केंद्र आहे. येथे मुले विविध विषयांची माहिती मिळवतात, आणि नवीन गोष्टी शिकतात. आणि आपल्या क्षमतांना वाढवतात. शिक्षणाने मुलांच्या जीवनात एक नवीन दिशा दिली जाते, आणि ते भविष्यकाळात चांगले नागरिक बनण्यास मदत करतात.
"जून महिना सुरु झाला की शाळेत न जाण्यासाठी रडणारी मुले आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. खरे तर मी सुद्धा लहान असतांना असा बऱ्याच वेळा रडले आहे. त्या वेळी मला सारखे वाटायचे की नको ही शाळा,
सुरू झाली सुरू झाली.....!
आमची शाळेची लगबग आता सुरू झाली,
शाळेच्या सुट्ट्या संपल्या आता,
दप्तर शोधा वया पुस्तक शोधा.....!
नवीन गणवेश उद्या घालायचा,
या विचाराने झोपच नाही आली......!
अशी आमची शाळेची लगबग आता सुरू झाली,
पुस्तकांतले आता नवीन धडे......!
शिकण्याची ही वेळ आली,
सुरू झाली सुरू झाली.....!
आमची शाळेची लगबग आता सुरू झाली,
सकाळी शाळेत सोडायची......!
आणि शाळा सुटले की घरी आनायची,
आईची ड्युटी चालू झाली.....!
सुरू झाली सुरू झाली,
आमची शाळेची लगबग आता सुरू झाली......!
सर्व मित्र-मैत्रिणी आता रोजच भेटणार,
सगळेजण आता खुप धमाल मस्ती करणार......! शाळेमध्ये खुप अभ्यास करुनी,
आई-वडिलांचे खुप नाव कमावणार......!
सुरू झाली सुरू झाली,
आमची शाळेची लगबग आता सुरू झाली......!
"आमची शाळा सुरू झाली की आम्हाला सकाळी लवकर उठावे लागत. शाळेची तयारी करून आई मला सकाळीच नाश्ता आणि डब्बा द्यायची,आई मला रोज शाळेत सोडायला पण यायची आई सोबत शाळेत जायला मला खूप मजा यायची 'शाळेचा पहिला दिवस म्हटलं की काही मुले शाळेत न जाण्यासाठी खूप रडायचे त्यांना पाहून आम्हाला पण खूप भीती वाटायची. पण आई म्हणायची की मी तुला घ्यायला लगेच येते. असे म्हणून आई मला वर्गामध्ये पाठवायची मला पण वर्गामध्ये जाताना फार रडायला यायचं.पण आमच्या मॅडम खूप प्रेमाने समजून सांगत.आम्ही सर्वजण वर्ग मध्ये गेलो. की आमच्या मॅडम किंवा सर सर्वप्रथम आम्हा सर्वांना आमचे नाव विचारत त्यानंतर आम्ही सर्वजण नवीन प्रकारचे खेळ खेळत, "शाळेचा पहिला दिवस एवढा भारी जायचा की खूप छान वाटत. शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी खुप सारे खेळ खेळत, आणि आम्हाला खुप सारे नवीन मित्र मैत्रिणी पण भेटत. शाळेचा पहिला दिवस आम्ही खूप मजा मस्ती करत.
"आजचा ब्लॉग मी शाळेच्या पहिला दिवस कसा गेला या विषयावर लिहिला आहे. तुम्हाला आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.
धन्यवाद..............!

0 Comments